Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमधक्कादायक : भावाकडूनच बहिणीशी समांगन, सख्ख्या भावासह चुलत भावाने केले तोंड काळे,...

धक्कादायक : भावाकडूनच बहिणीशी समांगन, सख्ख्या भावासह चुलत भावाने केले तोंड काळे, अल्पवयीन बहिण सहा महिन्याची गरोदर, बीड ग्रामीण पोलिसात बलात्काराचा गुन्हा


दोन जण ताब्यात, अन्य एकाने केला होता विनयभंग, तोही पोलिसांच्या अटकेत
बीड (रिपोर्टर)- अंबाजोगाईतील बलात्कार प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिलेली असतानाच नात्याला काळिमा फासण्याची घटना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या भावासह चुलत भावाकडून सतत बलात्कार झाल्याने सदरची मुलगी ही सहा महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी दोघा भावांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने या आरोपींविरोधात पोस्को अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. अन्य एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या आई-वडिलांसह राहणार्‍या एका 16 वर्षीय मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून तिचा सतरा वर्षीय सख्खा भाऊ आणि 15 वर्षीय चुलत भाऊ बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला आईने भाऊबीज दिवशीच बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखविले असता डॉक्टराने ती गर्भवती असल्याचे सांगितले. हा प्रकार पिडिता आणि तिच्या आईलाच माहित होता. त्यानंतर काल हा प्रकार पिडितेच्या वडिलाला माहित झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि पिडितेने दिलेल्या जबाबावरून तिचा सख्खा भाऊ आणि चुलत भावावर कलम 376, 354 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पो. उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत यांनी भेट दिली. याच मुलीचा गावातील सत्यम सिताराम धोंडकर याने विनयभंग केल्याची घटनाही घडली होती. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सत्यम याला ताब्यात घेतले असून दोन अल्पवयीन भावांची चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!