इलेक्ट्रिक कारणाने गाडीने पेट घेतला की पेटवली यासाठी आरटीओ पाहणी करणार
आष्टी ( रिपोर्टर):-मोठी बातमी समोर येतेय आष्टीचे तहसिलदार यांच्या गाडीला मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.गाडीला आग लावली का लागली? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही इलेक्ट्रिक कारणाने आग लागली की गाडी पेटवली तपास करण्यासाठी आरटीओ यांना पाहणी करण्यासाठी बोलवले असुन आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी रिपोर्टर शी बोलताना दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले परंतु गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की आष्टीचे तहसिलदार प्रमोद गायकवाड यांची शासकीय बोलोरो गाडी क्र.एम.एच.23 एएफ 1003 आज मध्यरात्री 2.30 मि.सुमारास पेटल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे .
जुन्या तहसिलदार निवास समोर हि गाडी लावण्यात आलेली होती. अचानक गाडी पेटली या गाडीने पेट घेतल्याची माहिती मिळताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला पाचारण करत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत ही गाडी पूर्ण भस्मसात झाली होती. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे अंदोलन सुरू असून मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र जिल्हाभरात पहायला मिळत आहे . मात्र आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की, आग लागली याचा अजून तपास लागला नसून याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस हे करीत आहेत.