Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडतुम्हाला रिवॉर्ड भेटणार म्हणत 20 हजाराला गंडावले

तुम्हाला रिवॉर्ड भेटणार म्हणत 20 हजाराला गंडावले


बीड (रिपोर्टर)ः- तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे. त्यामुळे फोन-पे वरिल घंटीला दाबून तुमचा पिन टाका असे म्हणत एका भामट्याने 20 हजाराला गंडावल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या मोबाइलवर भामट्याने फोन करुन तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही फोन पे वरिल घंटीला दाबा आणि तुमचा पिन टाका तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे भेटतील असे म्हटल्याने फिर्यादीने पिन टाकताच भामट्याने विस हजार रुपये खात्यामधून गायब केले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!