लेखी म्हणणे आणि तो कथित व्हिडिओ विभागाकडे दाखल, कारवाईची अपेक्षा – तक्रारदार
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथील दुय्यम निंबधक कार्यालयात मुद्रांक विक्रेता हा आधिकाऱ्याचे नाव घेऊन खुलेआम पैसाची मागणी करत आसल्याचा कथित व्हिडिओ शेतकरी पुत्राने काढला होता.यांची तक्रार केल्यानंतर तक्रारदार यांचे लेखी म्हणणे आणि कथित व्हिडिओ जिल्हा मुद्रांक विभागाकडे सपूर्त केला असुन संबधित एजंट आणि कर्मचारी यांच्यावर कार्यवाही काय होते ? हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे.तर साजं.दै. रिपोर्टरने याबाबतचे सविस्तर वृत्त दि.17आँक्टोबरच्या अंकात प्रसिध्द केले होते.
वडवणी येथील रहिवाशी असणारे शेतकरी माणिक सिताराम राठोड व त्यांचा मुलगा देविदास राठोड हे गेल्या महिन्यात दुय्यम निंबधक कार्यालयात 2 लाख रुपायाचे शेतीचे माँडगेज करण्यासाठी गेले होते. येथील मुद्रांक विक्रेते असणारे अशोक लोळगे यांनी अधिकाऱ्यांचे नाव घेऊन पैसाची मागणी केली होती. यांचा सविस्तर व्हिडिओ शेतकरी पुत्र देविदास राठोड यांनी काढल्या नंतर या कार्यालयातीला भष्टाचाराचा कोथळा समोर आला होता. शेतकरी पुत्र असणाऱ्या तरुणाने याबाबतची तक्रार केली होती. या प्रश्नी जिल्हा मुद्रांक अधिकारी अशोक आटोळे यांच्या दालनात दि.7 नोंव्हेबर रोजी सुनावणी झाली यावेळी फक्त तक्रारदार उपस्थित होते.तर संबधित एजंट आणि आयटी असिस्टंट कर्मचारी किशोर मात्रे अनुपस्थित असल्याने तक्रारदार यांचे तोंडी म्हणणे ऐकून घेत सविस्तर लेखी तक्रार करण्यासाठी तक्रारदार यांना वेळ दिला होता. तर दि.13 नोंव्हेबर 2023 या दिवशी पुन्हा तक्रारदार यांनी त्यांचे म्हणणे सविस्तर लेखी स्वरुपात दिले असुन वडवणी येथील दुय्यम निंबधक कार्यालयातील खुलेआम पैसाची मागणी करणारे मुद्रांक विक्रेता आणि कर्मचारी यांच्यावर कार्यवाही काय होते? यांचा संपुर्ण कारनामाचा लेखाजोखा तक्रारदार यांनी जिल्हा मुद्रांक विभागाकडे सपूर्त केला असून संबधितावर लवकर कार्यवाही व्हावी हि अपेक्षा तक्रारदार यांनी केली आहे.
फोन उचलला नाही
याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा मुद्रांक आधिकारी ए.बी.आटोळे यांच्याशी दै.रिपोर्टरने मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आटोळे साहेब यांनी मोबाईल उचलला नसल्याने याबाबतची त्यांनी काय कार्वाही केली हि माहिती मिळू शकली नाही.
पाठपुरावा करतच राहणार – तक्रारदार
याबाबत तक्रार केली असुन सुनावणी देखील झाली आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे वरिष्ठ आधिकारी यांच्याकडे सपूर्त केले आहेत. सुनावणी दरम्यान संबधित एंजट आणि कर्मचारी अनुउपस्थित होते. याबाबत जो पर्यत कार्यवाही होत नाही तो पर्यत पाठपुरावा करतच राहणार आहे. अशी प्रतिक्रिया तक्रारदार शेतकरी पुत्र देविदास राठोड यांनी दिली आहे.









