बीड (रिपोर्टर): बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाची दुरावस्था असून याकडे क्रीडा विभागाने लक्ष द्यावे, या मागणीसाीं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सामाजिक कार्यकर्त्यांनी खो-खो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे काम रखडलेले आहे, सदरील हे काम तात्काळ करण्यात यावे, संकुलासाठी आलेला निधी पडून असून त्याचा उपयोग का केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत क्रीडा विभागाने आपल्या कामकाजात सुधारणाक करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खो खो आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनुस, मिलिंद सरपते, सुदाम तांदळे, शेख मुबीन, शेख मुश्तीक, शिवशर्मा शेलार, अशोक येडे, भीमराव कुटे, सय्यद सादेक,, संजय पावलेंसह आदींची उपस्थिती होती.