बीड (रिपोर्टर) धारूर येथील मंडल अधिकार्याने इनामी जमीनीबाबत गैरप्रकार केला असून सदरील मंडल अधिकार्याला निलंबीत करण्यात यावे, या मागणीसाठी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. हे आंदोलन सय्यद सलीम फत्तू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
धारूर येथील तत्कालीन मंडल अधिकारी कुरेशी यांनी खिदमत माश इनामी जमीन, गायरान जमीन, सिलिंग जमीन या मिळकतीची त्यांच्या कार्यकाळात वर्ग 2 ची मिळक वर्ग 1 मध्ये केली. तसेच मस्जीद, मंदिर, दर्गाह, कब्रस्तान, ईदगाह या मिळकतीचे बेकायदेशीर फेरफार भूखंड माफियाला हाताशी धरून केले. सदरील या गैरप्रकारा प्रकरणी कुरेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकराी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. हे आंदोलन सय्यद सलीम फत्तू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या वेळी अनेक कार्यकर्त्यांची व नागरीकांची उपस्थिती आहे.









