बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने 20 ते 25 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतकर्यांनी कापूस, सोयाबीनची लागवड केली त्या शेतकर्यांचे बियाणे उगवले खरे परंतु त्याला पावसाची गरज भासू लागली आहे. दोन दिवसांपासून अगदी तुरळक स्वरुपात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असला तरी अजूनतरी राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. थोड्या पावसावरच काही ठिकाणी पेरण्या झाल्या. बीड जिल्ह्यात 20 ते 25 टक्केपर्यंत पेरण्या झाल्या असून ज्या शेतकर्यांनी कापूस, सोयाबीनची लागवड केली त्या शेतकर्यांचे बियाणे उगवून आले मात्र आता त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. तर काही ठिकाणी मात्र साधे ढेकळंही फुटले नाहीत. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी या दोन दिवसात धुव्वाधार पघाऊस पडला नाही. काही ठिकाणी अगदी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला आहे.