तिघांवर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) शेतात औत हाणत असताना सालगड्याकडून बांधावरील तार कंपाउंडचा लोखंडी अँगल जूवाचा धक्का लागल्याने वाकल्यामुळे शेतमालक भरत रामकिसन सुरवसे आणि त्यांच्या भावाला बाळू भारत गिते, राम भारत गिते, भारत महादेव गिते (रा.सबदराबाद) यांनी डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तर सुभाष किसन याच्या हातावर दगड मारून मुक्कामार दिला व दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिरसाळा पोलिसात बाळू गिते, राम गिते, भारत गिते यांच्यावर भरत सुरवसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.