चौघा जणांविरोधात अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): भोळसर मुलीने नशेच्या इंजेक्शनमधून पाणी पिल्याने तिची प्रकृती अत्यावस्थ झाली होती. याचा जाब मुलीचा पिता विचारण्यासाठी गेला असता त्यास तिघा जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना पाटोदा तालुक्यातल्या पाचंग्री येथील गुर्हाळावर घडली. या प्रकरणी गुर्हाळ चालकासह अन्य दोघांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसा गुन्हा दाखल करण्यात आला.
शर्मा बप्पा काळे (वय 37 वर्षे, रा. पाचंग्री ता. पाटोदा) यांच्या भोळसर मुलीने नशेच्या इंजेक्शनमधून पाणी पिले होते. हे नशेचे इंजेक्शन गुर्हाळावरील सतीश चव्हाण नामक इसम घेत असे. नशेच्या इंजेक्शनमधून पाणी पिल्याने मुलीची प्रकृती अत्यावस्थ झाली होती. याचा जाब विचारण्यासाठी मुलीचा पिता शर्मा काळे हा सतीश चव्हाण व गुर्हाळ मालक दादा ढेरे यांच्याकडे गेला असता त्यास तिघा जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहार केली. या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दादा अण्णा ढेरे, बापुराव दादा मुंडे, जयराम बापुराव मुंडे यांच्या विरोधात कलम 323, 504, 50, 34, 3 (आर) एस 3 (2) भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











