बीड (रिपोर्टर): दिंद्रुड येथील विद्यमान सरपंच अजय दिलीप कोमटवार यांचे राजगोंडा जातीचे प्रमाणपि छत्रपती संभाजीनगर येथील अनुसुचीत जमाती पडताळणी समितीने रद्द केले असून चुकीचे प्रमाणपि काढल्यामुळे त्यांच्यावर तहसीलदार माजलगाव यांनी गुन्हा दाखल करावा, असेही समितीने या आदेशात म्हटले आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसुचीत जमातीसाठी राखीव राहिले होते. मात्र या जमातीसाठी एकही ग्रामपंचायतचा वार्ड आरक्षीत न राहिल्याने अजय दिलीप कोमटवार यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविली मात्र सरपंचपद हे अनुसुचीत जमातीसाठी राखीव असल्यामुळे आणि या प्रवर्गाचे ते एकमेव निवडून आल्यामुळे सरपंचपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर आपले राजगोंडा जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करावे, यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसुचीत जमाती पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केला. त्यांच्या प्रस्तावावर दिलेले पुरावे, पोलिसांचा गृह चौकशी अहवाल या सर्वांचे तब्बल तीन वर्षे या समिऋतीने तपासरी केली. गौंड जात, त्याचे खाडाखोड करून राजगौंड लावणे आणि कोणताही पुराव्यासोबत त्यांची जात सिद्ध न झाल्यामुळे माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना दिलेले राजगोंड जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची शिफारस अनुसुचीत जाती जमाती पडताळणी समिती यांनी काल एका आदेशानुसार केली आहे.











