बीड (रिपोर्टर): श्रीराम जन्मभूमीवर भव्यदिव्य मंदिरामध्ये येत्या 22 जानेवारीला दुपारी साडेबाराच्या शुभमुहूर्तावर श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी विधीवत पुजा होणार असून चतुर्वेद पाायण स्वाहाकार यज्ञ चालू आहेत. 10 जानेवारी ते 14 जानेवारीमध्ये शुक्ल यजुर्वेद माद्यदीन शाखेच्या वेद पारायणासाठी बीड जिल्ह्यातील अक्षय रत्नपारखी गुरुजी यांना निमंत्रण प्राप्त झाले आहे. रत्नपारखी गुरुजींच्या रुपाने बीडसाठी हा मोठा बहुमान मानला जातोय.
अक्षय रत्नपारखी गुरुजी हे गेल्या पाच वर्षांपासून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथे रेणुका वेद विद्यालय गुरुकुलम नावाने वेदपाठशाळा चालवत आहेत. सध्या या गुरुकुलममध्ये 15 विद्यार्थी वेद अध्ययन करत आहेत. वेदांमध्ये पारांगत असलेले अक्षय भास्करराव रत्नपारखी गुरुजी यांना थेट अयोध्येतून निमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा विधी होत असून यासाठी चतुर्वेद पारायण व स्वाहाकार यज्ञ चालू आहेत. 10 जानेवारी ते 14 जानेवारी मद्यशुल्क यजुर्वेद माद्यदिन शाखेच्या वेद पाायणासाठी रत्नपारखी गुरुजी जाणार आहेत. त्यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला एक बहुमान प्राप्त झाला आहे.











