बीड (रिपोर्टर): रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका व्यक्तीस चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने यामध्ये सदरील व्यक्ती गंभीर जखमी होऊन मरण पावला.ही घटना कोळवाडी फाट्याजवळ घडली. दुसरा अपघात युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. रिक्षा चालकाने आपला रिक्षा भरधाव वेगात चालवल्याने रिक्षा पलटी होऊन चालक ठार झाला.
नवनाथ गणे म्हेत्रे हे सोलापूर रोडवरील कोळगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभे असताना त्यांना पाठीमागून आलेल्या मोसा गाडीने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. या प्रकरणी चालकाविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी अपघाताची घटना युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव ते धनेगाव या रस्त्यावर घडली. सुर्यकांत अशोक कुचेकर हे आपला रिक्षा चालवत असताना धनेगाव कॅम्पजवळ त्यांचा रिक्षा (क्र. एम.एच. 23 9998) हा पलटी झाला. यात ते गंभीररित्या जखमी होऊन मरण पावले. या प्रकरणी युसुपवडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.











