बीड (रिपोर्टर): राशनवर पुरवठा होणार्या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येऊ लागली. या प्रकरणी पुरवठा विभाग कुठलीही भूमिका घेत नसून भेसळ प्रकरणी पुरवठा विभागच दोषी आहे. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी जिल्हाध्यक्षांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राशनवरील गहू, तांदूळ यामध्ये भेसळ होऊ लागली. भेसळयुक्त धान्य गोरगरीबांना वाटप केले जात आहे. याबाबत पुरवठा विभाग कुठलीही ठोस भूमिका घेत नाही. पुरवठा विभागाने भेसळ करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या आंदोलनात अशोक येडेसह आदींचा सहभाग होता.











