वडवणी मधून ट्रॅक्टरचे हेड पळवले
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासुन वाहन चोरीच्या घटना वाढल्या. दररोज कोठे ना कोठे दुचाकी चोरीची घटना होत आहे. दुचाकी बरोबरच आता चारचाकी गाड्यांच्या चोर्या देखिल वाढू लागल्या. वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील ट्रॅक्टरचे हेडचोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास विठ्ठल अंडिल (वय 32, रा. थेटेगव्हाण) यांनी आपला ट्रॅक्टर क्र.एम.एच.25.एन.5905 हा कुप्पा या ठिकाणी उभा करण्यात आला होता. सदरील हा ट्रॅक्टर ऊसाची वाहतूक करत होता. ट्रॅक्टर मालक गावाकडे गेल्याने याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टरचे हेड चोरून नेले. अंडिल परत आल्यानंतर आपले ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे निर्देशनात आल्यानंतर त्यांनी वडवणीपोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासुन बीड जिल्ह्यामध्ये चोरयाचे प्रमाण वाढले. दुचाकी गाड्या तर सर्रासपणे चोरीला जावू लागल्या आता चार चाकी गाड्याही चोरीला जात असल्याचे दिसुन येत आहे. गाड्या चोरणार्या टोळ्या सक्रीय आहे. आता पर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या त्यातील काही गाड्यांचाच तपास लागला. बहुतांश गाड्यांचा अजुनही तपास लागलेला नाही. वाढत्या वाहन चोरीच्या घटनेमुळे वाहन धारकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे












