बीड, (रिपोर्टर)ः- शहेंशाहवली दर्गाच्या पाठीमागे नालीचे पाणी इतर ठिकाणी वाहु लागल्याने या भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. शाळकरी मुलांना अक्षरशः नालीमधील पाण्यातून प्रवास करावा लागतो. या भागात दोन नगरसेवक आहेत. मात्र ते फक्त बघ्याची भुमिका घेवून स्वतःचा स्वार्थ सादत असतात. नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांना साधी नाली ही करता आली नसल्याने त्यांच्या विरोधात या भागातील नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे.
शहेंशाहवली दर्गाच्या पाठीमागील चुन्नू मिस्त्री यांच्या घराजवळ रस्त्याची अवस्था बिकट आहे. नाली व्यवस्थीत नसल्याने त्याचे पाणी इतर ठिकाणाहून वाहु लागले आहे. शाळकरी मुलांना नालीमधूनच प्रवास करावा लागतो. नगर पालिका प्रशासन नुस्तेच विकासाचे दावे करत आहेत. या भागात दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र या नगरसेवकांना साधी नाली ही करता आली नाही. सदरील हे नगरसेवक नुस्ते राजकारण आणि फोटोसेशन करण्यात मग्न असतात. विकासा संदर्भात त्यांना कसलेही देणे घेणे नसतं. अशा संधी साधू स्वार्थी लोकप्रतिनिधी विरोधात या भागातील नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान दोन्ही नगरसेवकाच्या दारासमोरच ही घाण असतांना त्यांना त्याचे काही वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जावू लागले.












