बीड, (रिर्पोर्टर)ः- मल्टीस्टेटमध्ये अनेक ठेवीदारांच्या कोट्यावधी ठेवी अडकून पडलेल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आज शिवसेनेच्या वतीने सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मल्टीस्टेटचे परवाने रद्द करा यासह इतर घोषणांचे फलक घेंवून ठेवीदार व शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.
ज्ञानराधा, जिजाऊ, छत्रपती, मराठवाडा अर्बन, साईराम या मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाले असुन त्यामध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रूपये अडकलेले आहेत. ठेवीदारांना अद्यापही पैसे मिळाले नसल्याने ते अडचणीत सापडले. आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा निघाला होता. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन काढण्यात आला होता. सदरील मोर्चा शिवसेनेच्यानेत्या सुष्मा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी माजी आ.सुनिल धोंडे, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, शेख निजाम, नितीन धांडे, गुजर, युवा सेनेचे गजानन कदम, अॅड.संगीता चव्हाण, राजाभाऊ महुवाले यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












