दिल्लीतील शेतकर्यांचं आंदोलन म्हणजे राहुल गांधींना सत्ता प्राप्तीसाठी पडलेलं स्वप्न
मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले, त्याचे सकारात्मक परिणाम होतील
बीड (रिपोर्यर): प्रितम मुंडेंना राज्यसभा आणि पंकजा मुंडे यांना लोकसभा ही चर्चा कोण करतं? हे मला माहित नाही. मात्र पंकजा मुंडे एक उत्तम प्रशासक आणि उत्तम नेता आहेत. त्या संधीचं सोनं करून केंद्रात जातील, असं म्हणत दिल्लीतील शेतकर्यांचं आंदोलन म्हणजे राहुल गांधींना पडलेलं सत्ता प्राप्तीचं स्वप्न आहे. मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलं त्याचे निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होतील, असे भाजपाचे नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
ते बीड येथे पदाधिकार्यांच्या बैठकीसाठी आले असता माध्यमांसोबत बोलत होते. येणार्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांना राज्यसभा तर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू असल्याचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारला असता ही चर्चा कोण करत आहे हे मला माहीत नाही आणि बीडमध्ये जी बैठक होणार आहे या बैठकीत कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकार्यांचे मत जाणून घेऊन बीडच्या लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे ठरवलं जाईल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
गोपीनाथ मुंडे हयात असताना ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करून घेण्याची अनेकांची भावना आहे आणि ती भावना वरिष्ठान पर्यंत आपण पोहोचवली असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या उत्तम प्रशासन आणि उत्तम नेता आहेत त्यामुळे संधी आल्यावर योग्य वेळी त्या संधीचं त्या सोनं करतील. केंद्र सरकार संपूर्णपणे शेतकर्यांच्या बाजूने असून दिल्लीमध्ये शेतकर्यांचे जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन म्हणजे मुंगेरीलाल राहुल गांधी यांना सत्ता प्राप्तीसाठी पडलेलं स्वप्न असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून शेतकर्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जात आहेत तर कोरोना काळामध्ये देखील मोफत धान्य नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं त्यामुळे दिल्लीतील शेतकर्यांचे आंदोलन हे राहुल गांधींना सत्ता प्राप्तीसाठी पडलेलं स्वप्न असल्याचे ते म्हणाले मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिला असून याचा निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होणार असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाच्या तरुण आणि तरुणींच्या चेहर्यावरचा आनंद आम्ही पाहिला आहे विधानसभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्याने निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.












