बीड (रिपोर्टर)ः- मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरुन बशीरगंज भागातून एका युवकाला स्काअरपिओ गाडीत बळजबरीने बसून रात्री 12 वाजता नेल्याची घटना घडली. यामुळे बशीरगंज भागात मोठी गर्दी जमली होती. त्या गाडीचा एका राजकीय पुढार्यांने पाठलाग करुन त्या युवकाची सुटका केल्याचे समजते. मात्र या प्रकरणी बीड शहर पोलीसात कसलाही गुन्हा दाखल झाला नाही.