व्यापकॉस कंपनीचे हुले व नाबार्डच्या अधिकार्यांना केले पाचाराण
बीड (रिपोर्टर)ः- गेल्या दोन दिवसापूर्वी राज्याचे अधिक्षक अभियंता कैलास पाटील यांनी बीड जिल्ह्यातील जलजिवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या अनेक कामांना भेटी दिल्या. कामाचा दर्जा बघितला, जी कामे झाली आहेत. अशा कामांची मोजमाप पुस्तीका, शेड्युल बी आदिंची तपासणी केली असता झालेले काम आणि प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेले काम याच्यामध्ये बरीच तफावत दिसून आल्याने अशा सर्व कामाच्या मोजमाप पुस्तीका, शेड्युल बी, कामाचे फोटो, कामाचे अंदाज पत्रक हे घेवून उद्या जलजीवन मिशन अंतर्गत व्यापकॉस कंपनी आणि नाबार्ड कंपनीला मुंबईत बोलावले आहे. या सर्व कामाची तपासणी मुंबईत होणार आहे.
दि.20 ते 23 मार्च या तिन दिवसात राज्याचे अधिक्षक अभियंता कैलास पाटील व त्याच्या इतर 5 अधिकार्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक कामांना भेटी दिल्या. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी, कासारी, पाटोदा तालुक्यातील वडझरी, म्हाळपाची वाडी, बीड तालुक्यातील पिंपळगव्हाण, गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी, शिरुर तालुक्यातील तरडगव्हाण, अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी, परळी तालुक्यताील मांडवा, धारुर तालुक्यातील खामगांव, माजलगांव तालुक्यातील छोटेवाडी आदि ठिकाणच्या कामाची पाहणी पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. अनेक ठिकाणी कामाच्या दर्जा सुधारण्याच्या सुचना देत व्यापकॉस कंपनीच्या अधिकार्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना वरील कामाच्या अंदाज पत्रक, शेड्युल बी, फोटो घेवून आदि घेवून नाबार्ड आणि व्यॉपकॉस कंपनीचे हुले यांना पाटील यांनी मुंबईत पाचारण केले आहे. हुले यांच्याबाबत अनेक सरपंच, गुत्तेदारांच्या तक्रारी आहेत. अनेक कामात त्यांची भागिदारी असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होत असते. अनेक ठिकाणी हुले यांनी कमी काम झाले असतांना वाढीव एम.बी. केल्याचेही आढळून आले आहे.