बीड (रिपोर्टर): लोकसभेची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी जिल्हावासी बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी बजरंग सोनवणे यांना लोकसभेत पाठवणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी बजरंग सोनवणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे परमेश्वर सातपुते यांनी केले.

ते पिंपळनेर परिसरातील मतदारांशी संवाद साधत होते. पिंपळनेर व बाभळवाडी येथे त्यांनी कॉर्नर बैठका घेतल्या. या वेळी बदामराव पंडित, संजय महाद्वार, रतन गुजर, गणपत डोईफोडे, रामचंद्र जाधव, गणेश पटाईत, सुदर्शन मोरे, अशोक पटाईत, अली कुरेशी, प्रभू नांदे, गणेश वायभट, सचीन कानडे, रघुनाथ राघुजी अण्णा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपळनेर व बाभळवाडी या ठिकाणी घेतलेल्या बैठकीत सातपुते म्हणाले की, शेतीमालाला भाव नाही, बियाणे खताचे भाव प्रचंड वाढले आहेत. गॅस, डिझेल, पेट्रोलची भाववाढ झालेली आहे. महागाईने सर्वसामान्य होरपळून जात आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारला हटविण्यासाठी आणि बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी बजरंग सोनवणेंना विजयी करा, असे आवाहन परमेश्वर सातपुते यांनी केले.










