Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईलोडशेडिंगवर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची नितीन...

लोडशेडिंगवर तोडगा! राज्य सरकार वीज खरेदी करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची नितीन राऊतांची माहिती


मुंबई (रिपोर्टर) राज्यात लोडशेडिंग होऊ नये आणि 24 तास वीज मिळावी यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत विषय आला होता. राज्य मंत्रिमंडळाने वीज खरेदी करायला मान्यता दिली आहे. केंद्रांच्या दरापेक्षा कमी दरात मिळणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

या निर्णयामुळं शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मागील वर्षी ही 192 कोटी रुपयांचा खर्च आला होता. कोळसा मिळावा यासाठी आमचे अधिकारी देशातील प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत आहेत. देशाचे कोळसा मंत्री आणि उर्जा विभाग एकत्रितपणे काम करत आहेत, असं ते म्हणाले.
वीज वसुली करण्याच्या संदर्भात बचत गटत्यांनी सांगितलं की, वीज वसुली करण्याच्या संदर्भात बचत गट नेमले होते. याची चौकशी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी गठीत केली आहे. राज्यात लोडशेडिंग होवू नये हा विषय कॅबिनेटमध्ये झाला. वीज मागणी वाढत असताना दुसरीकडं कोळसा साठा कमी येतोय. कधी कधी रेल्वेचे रॅक कोळशासाठी उपलब्ध होत नाहीयत. कोयनेत 17 टीमसीच पाणी उपलब्ध आहे. वीज दहा ते बारा रूपयांना मिळते. पण आता बाजारात वीज मिळत नाहीय. गुजरातमध्ये आठवड्यातून एक दिवस वीज बंद केली आहे, असंही राऊतांनी सांगितलं.

Most Popular

error: Content is protected !!