कारवाई करण्याची मयताच्या कुटूंबियाची
मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- मुलाच्या प्रेम प्रकरणावरून पित्याने मुलीच्या घराच्या परिसरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना काळेवाडी येथे घडली.मयत पित्याचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आले. मुलीच्या नातेवाईकाविरोधात कारवाई करावी अशी मागणी मयताच्या कुटूंबियांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली. मृतदेह रूग्णवाहिकेमध्ये ठेवून नातेवाईक जिल्हा पोलीस अधिक्षक यांना भेटण्यासाठी गेले होते. दुपारी 1 वाजेपर्यत या प्रकरणी कुठलीही कारवाई झाली नव्हती.
मोहन पवार (वय 45 रा.काळेवाडी ता.बीड) यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम प्रकरण होते. या प्रेम प्रकरणाला वेगळी कलाटणी लागली. मुलाच्या पित्याने मुलीच्या घराच्या परिसरात जावून गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आले. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयताच्या कुटूंबियांनी केली. मयताचे कुटूंब जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या भेटीला गेले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत मृतदेह जिल्हा रूग्णालयाच्या आवारात रूग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आला होता.