परळी (रिपोर्टर): भाजपाच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट करणार्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल शिरूर बंदनंतर आज परळी शहर कडकडीत बंद ठेवून मुंडे समर्थकांनी रॅली काढत थेट तहसील कार्यालय गाठले. त्याठिकाणी आपल्या मागण्यांचे निवेदन देत पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.
गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. याचे तीव्र पडसाद बीड,नगर जिल्ह्यात उमटताना दिसून आले. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रथम नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे बंद पुकारण्यात आला. त्यानंतर काल शिरूर येथे बंद पुकारून घटनेचा निषेध करत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, पाठोपाठ आज परळी शहर बंद करून घटनेचा निषेध करण्यात आला. परळी शहरात वंजारा समाज बांधवांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ रॅली काढत प्रचंड घोषणाबाजी केली. एक रॅली काढत त्यांनी थेट तहसील कार्यालय गाठले, त्याठिकाणी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.