जिल्हाभरातले शिवालये भक्तांनी फुलले
बीडचे कंकालेश्वर, सोमेश्वर, कपीलधार, नारायणगड, चाकरवाडीसह अन्य शिवालयांमध्ये शिवभक्तांची तोबा गर्दी
बीड/परळी (रिपोर्टर): हर हर महादेव शिवशंभोचा गजर करत देवाधिदेव महादेवांचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातल्या शिवालयांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देभरातून शिवभक्त परळीत डेरेदाखल झाले आहेत. एकीकडे पशूधन महा एक्सपो प्रदर्शनाला लोकांची उपस्थिती असल्याने गेल्या 36 तासात तब्बल साडेतीन लाखंपेक्षा जास्त शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. इकडे बीडमध्ये कंकालेश्वर, सोमेश्वर, चाकरवाडी, कपीलधार, निळकंठेश्वर, बोबडेश्वर, गुप्तेश्वर, पापनेश्वर आणि धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडावर भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जिल्हाभरातले शिवमंदिरांना सजावटीने अधिक सुंदर बनवण्यात आले असून भक्तांच्या उपस्थितीने मंदिरे फुलून गेली आहेत.
परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने शिवभक्त परळीत डेरेदाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परळीमध्ये पशूपशूधन महाएक्सपो प्रदर्शन सुरू असल्याने देशभरातील नागरीक या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याबमरोबर प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भक्तीभावाने प्रभूवैद्यनाथाचे दर्शन घेतले. गेल्या छत्तीस तासांच्या कालखंडात साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोय बंदोबस्त याठिकाणी पहायला मिळतो. बीड सह जिल्हाभरातील शिवालयांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. धाकटी पंढरी म्हून ओळखल्या जाणार्या नारायणगडासह कपिलधार, चाकरवाडी, कंकालेश्वर, सोमेश्वर, पापनेश्वर, निळकंठेश्वर आदी शिवालये भक्तांनी फुलून गेले आहेत. हर हर महादेव, शिवशंभोचा गजर करत महाशिवरात्रीच्या अनुषंगाने भक्तगण पापनाशकाच्या चरणी लीन होताना दिसून येत आहेत. सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण पहावयास मिळते.









