भुजबळ, मुंडे, सामंत, महाजन, सावे अन् हाकेंमध्ये काय चर्चे होते उभ्या महाराष्ट्राचं लक्ष
हाके आज उपोषण मागे घेण्याची शक्यता
संभाजीनगर (रिपोर्टर): ओबीसी उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी सहा मंत्र्यांसह 12 जणांचं शिष्टमंडळ आज खास विमानाने संभाजीनगरच्या विमानतळावर डेरेदाखल झाला. तेथून वडीगोद्रीकडे रवाना होत उपोषणस्थळी गेले. तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं असून जे कुणबी प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत ते रद्द करून देणारे आणि घेणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पत्रकारांसमोर मांडत ‘मला उद्ध्वस्त करणं हे जनतेच्या हातात आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’, असा टोला मराठा आंदोलक जरांगे यांना भुजबळांनी मारला. या शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीष महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश आहे.
सरकारचं एक शिष्टमंडळ आज विमानाने संभाीनगरात डेरेदाखल झाले. तेथून ते पुढे वडीगोद्री येथे उपोषणस्थळी आले असून याठिकाणी उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सोबत ते चर्चा करत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून प्रा. हाके हे ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत. या शिष्टमंडळात भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नेते आणि अधिकारी येणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड, प्रशांत जोशी, अजय पाटणे यांनी हाकेंची भेट घेण्यासाठी आले आहेत. उपोषणस्थळी हाके यांच्या सोबत काय चर्चा होते याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या वेळी छगन भुजबळ यांनी हाके यांनी आत्मक्लेष सोडून उपोषण सोडावं यासाठी आम्ही सर्व विनंती करणार असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी कालच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे सांगीतले असून चुकीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून कुणबी प्रमाणपत्र घेणारे आणि देणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. त्याचबरोबर जरांगेंबाबत बोलताना माझं करीअर उद्ध्वस्त करण्याची ताकद जनतेत आहे, कुठल्या कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतं, असेही त्यांनी या वेळी म्हटलं. आता शिष्टमंडळ तिथं पोहचलं असून चर्चेला सुरुवात झाली आहे. याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे मात्र लक्ष्मण हाके आज उपोषण मागे घेण्याची दाट शक्यता आहे.
राजेश टोपेंची तडकाफडकी भेट
जालना उपोषणाच्या 10व्या दिवशी राजेश टोपे यांची ओबीसी आंदोलनाला तडकाफडकी भेट ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन विचारपूस केली. अवघी पाच मिनिटे या व्यासपीठावर थांबले सरकारने सामंजस्याने तोडगा काढावा असे सांगत असताना पत्रकारांनी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी असताना उपोषण स्थळाला याला एवढा उशीर का झाला असावा केला असता आपण सेक्युलर विचाराचे असल्याचे उत्तर राजेश टोपे यांनी यावेळी दिले.