बीड (रिपोर्टर)ः-राज्यातील शेतकरी संकटात असून शासनाने शेतकर्याची कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन अजय बुरांडे मुरलीधर नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. यावर्षी अजुन समाधानकारक पाऊस पडला नाही. शेतकर्यांच्या हितसाठी शासनाने पुढाकार घ्यावा. नियमीत पिककर्जाची फेड करणार्या व अडचणीमुळे पिककर्ज फेडू न शकलेल्या शेतकर्यांची संपुर्ण पिक कर्ज सरसकट विनाअट माफ करावे यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.