बीड (रिपोर्टर) येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने नवीन मतदारांना आपली नोंदणी करता येणार. 25 जूनपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 24 जुलै आहे.
केंद्रिय निवडणूक आयोगाने मतदान नोंदणीपासून ते पत्ता बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. 25 जूनपासून नवीन मतदार नोंदणीला सुरुवात झाली. 24 जुलैपर्यंत मतदारांना आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. दरम्यान या मोहिमेमध्ये मतदार यादीमध्ये चुकीची दुरुस्ती सुद्धा करता येणार. जुने फोटो बदलणे, पत्त्यामध्ये आणि नावामध्ये दुरुस्ती करता येणार, मतदान केंद्राची सीमा निश्चित करता येणार. 19 ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन हरकती दूर करता येणार आहे आणि 20 ऑगस्टला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील नवीन मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.