बीड (रिपोर्टर): पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी नामलगाव येथील आशापुरक गणेशाला नारळ फोडण्यास सुरुवात केली. आज उमेदवारी अर्ज भरेपर्यंत पाच हजारापेक्षा जास्त नारळ फोडण्यात आले होते.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी व त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी गणेश लांडे व गणेश पुजारी या दोघांनी नामलगाव येथील आशापुरक गणेशाला नवस केला होता. काल पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली. त्यानंतर त्यांनी नवस फेडण्यास सुरुवात केली. उमेदवारीची घोषणा बातमी मिळाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत या दोघांनी मंदिरात नारळ फोडले. या नारळांची संख्या 5 हजारपेक्षा जास्त होती.