बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरुच असून अनेक प्रभागांमध्ये 15 ते 3 तीन आठवड्याला पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होऊ लागलेय. पंचशीलनगर येथील महिलांनी आज पाण्यासाठी नगरपालिका कार्यालयात ठिय्या मांडून न.प. प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून शहरामध्ये वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. शहरातील नागरिकांच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाऊ लागले. पंचशीलनगर येथे तीन आठवड्यापासून पाणी आले नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आज येथील महिलांनी नगरपालिका कार्यालयात ठिय्या मांडला होता. या वेळी ससाने कांता, सुमन कांबळे, चंद्रकला, गायसमुद्रे आदी महिलांची उपस्थिती होती. आपल्या मागण्याचें निवेदन प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आले.