बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक सुरू झाली असून या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती त्याचबरोबर शरद पवारांचे सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांपर्यंत विचार कसे पोहचले जातील याबाबत चर्चा हाते आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांना जयंत पाटील हे मार्गदर्शन करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक राष्ट्रवादी भवनामध्ये आज सकाळी बारा वाजता सुरू झाली. या बैठकीला जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यासह प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होत असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याचे सांगण्यात येते. खा. बजरंग सोनवणे यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषण केले. तर अन्य पदाधिकार्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपआपल्या अडीअडचणी अध्यक्षांसह मांडायला सुरुवात केली होती. जयंत पाटील आपल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.