शुभेच्छा देण्यासाठी हजारो समर्थकांची उपस्थिती
परळी (रिपोर्टर) बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो वृक्षांचे रोपण करत त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्धार करत समर्थकांनी परळीसह जिल्हाभरात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाची आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली. आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मीणबाई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले तर धनंजय यांनी आईच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. दुपारी बारा वाजता प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन वैद्यनाथाला अभिषेक घालत शेतकर्याला सुखी-समृद्ध ठेव, असे साकडे धनंजय मुंडेंनी घातले. निवासस्थानासह हलगी गार्डन येथे मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. लोकनाथाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून समर्थकांची उपस्थिती प्रामुख्याने दिसून येत होती.
संघर्ष योद्धा म्हणून राज्यभरात सुपरिचीत असलेले जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आ. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून हजारो समर्थक आज परळीत डेरेदाखल झाले. सकाळी आई रुक्मीणबाई पंडितराव मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. या वेळी आईच्या चरणाशी नतमस्तक होत धनंजय मुंडेंनी आशीर्वाद घेतले. तेथून ते थेट वैद्यनाथ मंदिरात गेले.
या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचा दुग्धाभिषेक करत भक्तीभावाने दर्शन घेत राज्यातला शेतकरी सुखी, समाधानी ठेवत समृद्धी दे, असे मागणे त्यांनी या वेळी मागितले. धनंजय मुंडेंचा यावर्षीचा वाढदिवस जिल्हाभरात समर्थकांनी हजारो वृक्षांचे रोपण करत त्या वृक्षांच्या संवर्धनाचा निर्धार केला. लोकनाथ म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहितले जात असून लोकनाथाचा वाढदिवस आज उत्साहात
साजरा होत आहे. मुंडे यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येने समर्तकांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर दुपारी परळी शहरातील हलगी गार्डनमध्ये शुभेच्छा स्विकारण्यासाठी धनंजय मुंडे थांबले. या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते. यावर्षी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस वृक्षारोपणासह त्याच्या संवर्धनाने करण्याचा निर्णय घेत समर्थकांनी लोकनाथाला दिर्घायुष्य मिळो, अशी सदिच्छा दिली. तर प्रभू वैद्यनाथाकडे तसे मागणेही मागितले.