गुजर समाज हा प्रतिकुल परिस्थितीवर मात करणारा समाज
बीड, (रिपोर्टर)ः- जो समाज प्रतिकुल परिस्थितीमध्ये राहुन इतिहास घडवू शकतो त्या समाजातले तरूण धैर्य ठेवत संघर्ष करत यशाची पताका नक्कीच फडकवतात. याचे ज्वलंत उदाहरण हे आजचे सत्कार मुर्ती जेवढे आहेत त्यातून समाजाला मिळते. इतिहास साक्षीला आहे, गुजर समाजातल्या निधड्या छातीच्या योद्धांनी देशासाठी राज्यासाठी प्राणाची आहुती दिली. त्याच समाजातले तरूण आज मेहनत घेतात, रात्रीचा दिवस करून माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात यशस्वी होतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे हातही तेवढेच महत्वाचे आमचे मित्र राजाभाऊ गुजर आणि बाळासाहे गुजर आपल्या समाजासाठी जे काम करतात ते काम अनंन्य साधारण आहे असे प्रतिपादन सायं.दै.बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांनी यावेळी केले.
ते गुजर समाजातील अधिकारी, कर्मचार्यांच्या आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात बोलत होते. गुजर समाजसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ (नाना) गुजर यांनी सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाध्ये गुजर समाजातील विविध विभागामध्ये प्राविण्य मिळवलेल्या 30 नवनिर्वाचित अधिकार्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सायं.दै.बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब हे होते. अध्यक्षीय भाषणामध्ये शेख तय्यब पुढे म्हणाले की, गुजर समाज हा लढवय्या समाज आहे. इतिहास साक्षीला आहे या समाजाने प्रतिकुल परिस्थितीमध्ये राहुन देशासाठी आणि राज्यासाठी अनेकांनी लिदान दिले आहे. परिस्थिती कशीही असो ते आव्हान स्विकारत संकटावर मात करत समाजातील प्रत्येकांनी त्या त्या संकटावर मात केलेली आहे. आज 21 व्या शतकात ते माहिती तंत्रज्ञानाचं आणि विज्ञानाचं आहे.
आता भाले, तलवारीने लढाया लढायच्या नाहीत तर त्या पेनाने आणि पुस्तकाने लढायच्या आहेत अशा स्थितीत प्रतिकुल परिस्थितीत धैर्य ठेवत, संघर्ष करत विविध प्रशासकीय विभागात अनेकांनी यशाची पताका त्या समाजातल्या या सत्कार मुर्तीची फडकवली आहे. त्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारे गुजर समाजसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ गुजर आणि त्यांचे बंधु तथा आमचे मित्र व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहे गुजर हेही आपल्या समाजासाठी धडपडतांना दिसुन येतात. समाजातल्या विद्यार्थ्याना वस्तीगृह मिळावे यासाठी नुकतेच त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. नक्कीच गुजर बांधवांचा हा प्रश्न आपण सर्व मार्गी लावू असा शब्दही यावेळी शेख तय्य यांनी दिला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांच्यासह हनुमान गुजर, शिवसेनेचे रतन गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्रक्ष बाळासाहे गुजर, हरिभक्त परारण बबन महाराज बहिरवाळ, डॉ. भारत दहे सर , पशुधन विकास अधिकारी डॉ. पंकज बहिरवाळ, सुभाष बहिरवाळ सरपंच पिंपळवाडी, महादेव नैराळे सरपंच नागझरी, महादेव बहिरवाळ, सचिन बहिरवाळ माजी सरपंच भाळवणी , आदी मान्यवर उपस्थित होते तर गुजर सेवा संघाचे उपाध्रक्ष युवराज बहिरवाळ, सचिव शिवाजी गोशीर सर, सह सचिव ज्ञानदेव खटाणे, पंजाब आहेर कोषाध्क्ष, सदस्र: -महादेव नहीराळे ( नागझरी चे सरपंच), सचिन बहिरवाळ, संजर डोंगर, कैलास गुजर,संजर भंडाणे, भरत गुजर, राजेंद्र पवार, विठ्ठल आबा गुजर,बबन बहिरवाळ, उपस्थित होते. प्रस्ताविक रतन तात्रा गुजर यांनी केले, कार्रक्रमाचे सूत्रसंचालन, जगताप सरांनी केले, तसेच आभार प्रदर्शन विक्रम डोंगर रांनी दमदारपणे केले .
समाजातील विद्यार्थ्याच्या वस्तीगृहाचा प्रश्न
ना.मुंडेंच्या माध्यमातून मार्गी लावू- बाळासाहे गुजर
गुजर समाज हा कर्तृत्वान समाज आहे या समाजातील विद्यार्थी हे मेहनती आहेत. प्रतिकुल परिस्थितीमुळे त्यांना सुविधा मिळत नाहीत. मात्र विद्यार्थ्याना सुविधा मिळाव्यात त्यांच्यासाठी एक वस्तीगृह असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनेे आम्ही प्रयत्न करत आहोत. पालकमंत्री ना. धनंजय मुुंडे यांच्या माध्यमातून हा प्रश्न नक्कीच निकाली काढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहे गुजर यांनी म्हंटले.