बीड (रिपोर्टर): शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या पदाधिकार्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, उलट पदाधिकार्यांवर एकप्रकारे दबाव आणण्याचं काम करत असल्याने त्यांच्या या चुकीच्या कारभाराला कंटाळून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जयमहाराष्ट्र करून मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती अॅड. संगीता चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख सचीन मुळुक सह आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाल्या की, या पक्षात अंधार करू लागल्या, त्या वारंवार आम्हाला शिवसेना शिकवण्याचे काम करू लागले. विशेषकरून पदाधिकार्यांवर दबावतंत्राचा वापर करत असल्याने आम्ही त्यांच्या या दबावतंत्राला कंटाळून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.