बीड, (रिपोर्टर)ः- टोयोटो इनोव्हा गाडीमध्ये बनावट देशी दारू जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काला झाल्यानंतर सुरडी फाटा येथे गाडीची झाडाझडती घेवून सदरील दारू जप्त केली. दारूसह एकूण 15 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली असुन इतर आरोपी फरार झाले आहेत.
कळंब केज रोडवर संशयीत वाहनांची तपासणी चालू असतांना मौजे सुरडी फाटा शिवार येथे टोयोटो इनोव्हा गाडी क्र.एम.एच.09.बीजे.0015 या गाडीत बनावट देशी दारू टॅगो पंचच्या-90 मिली क्षमतेच्या 5 हजार सिलबंद बाटल्या असा एकुण 15 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी गोकुळ रामभाऊ धुमाळ (रा.शिनगारे गल्ली धारूर) यास अटक करण्यात आली तर इतर आरोपी फरार झाले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे निरिक्षक आगळे, आरबी राठोड, गुरव, काळे, कोरे, पाटील, सांगुळे, मोरे, गोनारे, जारवाल, सुशील ढोले, लोमटे, मस्के, डुकरे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास व्ही.डी आगळे हे करत आहेत.