बीड (रिपोर्टर): 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन होता. या दिवशी शिक्षकांना पुरस्कार दिला नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करत जिल्हा परिषद इमारतीच्या पार्यांवर आंदोलन केले. या वेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जन्मदिनी शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. यावषर्क्ष जिल्हा परिषद प्रशासनाने 5 सप्टेंबरला पुरस्कार दिले नसल्याने प्रशासनाचा निषेध केला. आज सकाळी जिल्हा परिषद इमारतीच्या पायर्यांवर बसून सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, मुश्ताक शेख, रामधन जमाले, नितीन पवार, बप्पासाहेब पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.