बीड, (रिपोर्टर)ः- स्विफट डिझायर गाडी मध्ये दारूचे बॉक्स जात असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी महालक्ष्मी चौकात गाडीआडवून त्यातील 20 देशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्विफट डिझायर क्रं.एम.एच.47 एम.5627 या गाडीमध्ये दारू जात असल्याची माहिती पीएसआय काकरवाल यांना झाल्यानंतर त्यांच्या पथकाने महालक्ष्मी चौकात गाडी आडवली. या गाडीमध्ये देशी दारूचे ॉक्स ज्याची किंमत 69 हजार 300 रूपये एवढी आहे. वीस बॉक्स गाडीमध्ये आढळून आले. या प्रकरणी भाऊसाहे आश्रुबा जाधव (रा.नाळवंडी) व दारूचा मालक बळीराम गायके (रा. नाळवंडी)या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक अविनाश बागरळ, अप्पर पोलिस अधिक्षक पांडकर, डीवायएसपी गोल्डे, पोलिस निरिक्षक बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. नि.बाळराजे दराडे, पीएसआय नितीन काकरवाल, नामदेव सानप, मोहसीन शेख यांनी केली.










