बीड (रिपोर्टर)- गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अल्प होती. मात्र आता रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आरोग्य विभागाला आज प्राप्त झालेल्या 605 संशयितांमध्ये 588 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज आलेल्या अहवालात अंबाजोगाई 2, बीड, धारूर, वडवणी, गेवराई प्रत्येकी एक, तर परळीत 6 आणि शिरूर तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले आहेत.