बीड, (रिपोर्टर)ः- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली. काही उमेदवार घोषीत झाले. मनोज जरांंगे पाटील ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार अशा ठिकाणी आपले उमेदवार देणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या गोठात खळबळ उडाली. काल मुख्यमंत्र्याचे पीए मंगेश चिवटे तसेच खा.बजरंग सोनवणे यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे.
उद्या मनोज जरांगे पाटील आपल्या काही उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यापुर्वी रात्री मुख्यमंत्र्यांचे पीए मंगेश चिवटे यांनी त्यांच्या भेट घेवून चर्चा केली. तसेच बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. इतरही काही इच्छूकांनी आणि नेत्यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. आतापर्यंत चिवटे यांनी चार ते पाच वेळा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या काही ठिकाणी जरांगे पाटील उमेदवार देणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या गोठात खळबळ उडालेली आहे.