धनंजय मुंडे परतळीतून तर अजित पवार बारामतीतून
मुंबई (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केचल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पहिली उमेदवार यादी जाहीर करत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असून परळीतून धनंजय मुंडे तर राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेले आ. प्रकाश सोळंके पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आजच्या 38 उमेदवारांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांचे अधिकृत नाव आहे.
महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या 38 उमेदवारांची यादी घोषीत केली असून अन्य उमेदवारांची घोषणा उद्या सकाळपर्यंत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज दुपारी एक वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही यादी घोषीत करण्यात आली आहे. या 38 मतदारसंघांमध्ये 1. बारामती – अजित पवार, 2. येवला – छगन भुजबळ 3. आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील 4 कागल – हसन मुश्रीफ 5. परळी – धनंजय मुंडे 6. दिंडोरी – नरहरी झिरवाळ
7.अहेरी – धर्मराव बाबा आत्राम 8. श्रीवर्धन – आदिती तटकरे 9. अंमळनेर – अनिल भाईदास पाटील 10. उदगीर- संजय बनसोडे 11. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले 12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके 13 वाई – मकरंद पाटील 14.सिन्नर- माणिकराव कोकाटे 15. खेड आळंदी- दिलीप मोहिते 16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
17. इंदापूर – दत्तात्रय भरणे 18.अहमदपूर- बाबासाहेब पाटील 19. शहापूर – दौलत दरोडा 20. पिंपरी- अण्णा बनसोडे 21. कळवण- नितीन पवार 22. कोपरगाव- आशुतोष काळे 23.अकोले- डॉ. किरण लहामटे 24. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे 25. चिपळूण- शेखर निकम 26. मावळ- सुनील शेळके 27. जुन्नर- अतुल बेनके 28.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने 29. हडपसर- चेतन तुपे 30. देवळाली- सरोज आहिरे 31. चंदगड- राजेश पाटील 32. इगतपुरी- हिरामण खोसकर 33. तुमसर- राजू कारेमोरे 34. पुसद- इंद्रनील नाईक 35. अमरावती शहर- सुलभा खोडके 36. नवापुर-भरत गावित37. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर 38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला