मुंबई (रिपोर्टर) एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसंबंधीच्या वादात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली होती. शिंदेंची ही झेड प्लस सुरक्षा आजही कायम आहे, असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे आरोप खोडून काढले.
शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली होती की नाही? याबाबत मी कालच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यांनीदेखील शिंदे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्याचे सांगितले. तसेच, कोणाला सुरक्षा द्यायची की नाही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला येऊ दिला नाही, हा आरोप साफ खोटा आहे.