मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रिपद
मुंबई (रिपोर्टर) भाजपच्या पनवेल येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असल्याचं कळलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं पाटील यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली. केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय राज्यातील भाजप पदाधिकार्यांना अद्याप पचलेला नाही, हे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून समोर आलं. या प्रकाराची भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं याची गंभीर दखल घेतल्याचं कळतंय.
पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक राजकीय, सामाजिक विषयांवरील ठराव संमत करण्यात आले.