आंबेडकरवाद्यांचे तहसिल कार्यालयावर तिव्र निदर्शने
वडवणी (रिपोर्टर):- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत बोलताना भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असंविधानिक भाषा वापरली आहे. यामुळे समाज बांधवाच्या भावना दुखवल्या प्रकरणी शहा यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा या मागणीसाठी आज वडवणी येथील आंबेडकरवाद्यांनी तहसिल कार्यालयावर तिव्र निदर्शने केली तर डाँ. आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालया पर्यत पायी रँली काढत मुर्दाबाद मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. या घोषणेनी शहर दणाणले होते.तर या मागण्याचे लेखी निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
सदरील निषेध रँलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या होत्या. यावेळ वडवणी शहरातील प्रमुख रस्ता दणाणला होता. या निषेध रँलीत व निवेदनावर भाई महादेव उजगरे, बाबासाहेब वाघमारे, राजू वाघमारे,दिपक उजगरे, बाबासाहेब साळवे, महादेव आवाड, एस.के.उजगरे, नवनाथ डोंगरे, राम झोडगे, प्रकाश तांगडे, सुभाष पवार, दामु गायकवाड, अविनाश साळवे, अविनाश झोडगे, रावसाहेब राऊत, आप्पाराव मुजमुले, ऋषीकेश उजगरे, शाम उजगरे, विजय डोंगरे, विनोद डोंगरे, आप्पाराव मुजमुले, विश्वानाथ उजगरे, सुनिल डोंगरे, संतोष उजगरे, धम्मपाल डोंगरे, अमोल वाघमारे,भाऊ उजगरे, प्रज्वल उजगरे, समाधान उजगरे, पदमाकर उजगरे, भैय्यासाहेब काकडे, यशपाल वाघमारे, अँड. सचिन अवचार, आण्णासाहेब मस्के, युवराज उजगरे, दिलीप रोकडे,निखील उजगरे, अँड.ऋषीकेश उजगरे, प्रशांत उजगरे,कृष्षा उजगरे, महादेव मुजमुले, दादा झोडगे,यश उजगरे, अमोल पौळ, प्रकाश उजगरे, विशाल गायकवाड, जय उजगरे, रुपेश उजगरे, किरण उजगरे, बंटी उजगरे, राज उजगरे, अतुल पाटोळे, अनिकेत उजगरे, सुरज उजगरे, राकेश उजगरे, बबन डोंगरे,रोषन उजगरे, तुषार उजगरे, नागुराव उजगरे,यासह वडवणी शहरासह तालुक्यातील आंबेडकवादी समाजातील तरुण उपस्थिती होते.