अनेक गाड्या लावल्या पोलीस ठाण्यामध्ये
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने आज अचानक पोलीस प्रशासनाने वाहनांची तपासणी केली असता ज्या वाहनधारकांकडे कागदपत्र आढळून आलेले नाहीत, अशी वाहने पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आली आहेत.
बीड शहरासह तालुकास्तरावरून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अनेक वाहनधारकांचे आरसीबुक, ड्रायव्हींग लायसेन्स तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये काही वाहनधारकांकडे कागदपत्रे आढळून न आल्याने त्यांचे वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली होती.