बीड (रिपोर्टर) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविंद्र दळवी यांचे पिता ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्काराने सन्मानीत उत्तमराव धोंडीराम दळवी यांचे आज सकाळी 7.15 वा. वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्ष होते.
त्यांचा अंत्यविधी बीड येथील अमरधाम स्मशानभूमी याठिकाणी आज दुपारी 4.30 वा. होणार आहे. त्यांचे पार्थिव राहते घर कबाडगल्ली बीड येथे अंत्यदर्शनास ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात मनोहर, अशोक, दिलीप, राजेंद्र, रविंद्र उत्तमराव दळवी अशी पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधून त्यांनी आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षीत करून उच्च विद्याविभुषीत केले आणि उच्च पदावर विराजमान होण्याचा संघर्ष करत एक आदर्श पिता म्हणून आपले व्यक्तीमत्व सिध्द केले. दळवी कुटूंबियांच्या दु:खात दै.रिपोर्टर परिवार सहभागी आहे.