दहा महिलांची सुटका, दोन महिलांसह एक पुरूष पोलिसांच्या ताब्यात

केज, (रिपोर्टर)ः- केज-बीड रोडवर असलेल्या कला केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाजुच्या शेतकर्याने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केल्यानंतर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान कला केंद्रावर धाड टाकली. यावेळी काही महिला व पुरूष त्याठिकाणी आढळुनआले. पोलिसांनी दहा पिडीत महिलांची सुटका करून दोषी असलेल्या दोन महिला आणि एका पुरूषा विरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
केजपासून 2 किमी अंतरावर असलेल्या बीड रोडवर महालक्ष्मी नावाचे कलाकेंद्र आहे. सदरील हे कलाकेंद्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. कलाकेंद्र बंद करण्याची मागणी या परिसरातील एका शेतकर्याने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली हेाती. पोलीस अधिक्षक काँवत यांनी शेतकर्याच्या तक्रारीची दखल घेत काल रात्री 3 वाजण्याच्यास सुमारास धाड टाकली. सदरील ही धाड विशेष पथकाने टाकली. त्या ठिकाणी काही महिला आढळुन आल्या होत्या. पोलिसांनी दहा पिडीत महिलांची सुटका केली असून दोन महिलांसह एका पुरूषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





