आज शेवटची तारीख, सर्व्हेर डावून होवू लागले
तारीख वाढवून देण्याची मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत गरजु नागरीकांसाठी घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून गाव पातळीवर गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन सर्व्हे केला जात आहे. मात्र या सर्व्हेमध्ये सातत्याने अडथळे येत असल्याने सर्व वंचित लोकांचा आज संध्याकाळपर्यंत सर्व्हे होत नाही. सर्व्हे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाने तारीख वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. वेळोवेळी सर्व्हेर डावून होत असल्याने अनेकांनी सांगितले आहे.
गाव पातळीवर अनेक नागरिकांना चांगला निवारा नाही. घरकुलासाठी गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन सर्व्हे केला जात आहे. सर्व्हे करत असतांना काही नागरीकांचा चेहरा स्कॅन होत नाही त्यामध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्याबरोबर इतरही काही अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. आज सर्व्हे करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारपर्यंत सर्व्हेर डावून असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या होत्या. सर्व वंचित नागरीकांचा आज सर्व्हे पूर्ण होत नाही. त्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व्हे पूर्ण करण्यासाठी तारीख वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.








