जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

बीड, (रिपोर्टर)ः- नेकनूर येथील सर्व्हे नं.308 व 329 मधील बांधकामाला तहसिलदारांनी स्थगिती आदेश दिलेला असतांनाही सदरील व्यक्ती बांधकाम करत असून त्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
सय्यद रौनक अली सय्यद मोहंमद अली (रा.नेकनूर) हे व त्यांचे कुटूंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. सय्यद यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की नेकनूर येथील सर्व्हे नं.308 व 329 मधील रस्त्यावरील चालू असलेल्या बांधकामाला तहसिलदार यांनी स्थगिती आदेश दिलेला असतांना सुध्दा गैर अर्जदार रस्त्यावर बांधकाम करत आहे. संबंधिताविरोधात योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी सय्यद रौनक अली व त्याचे कुटूंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.





