भायाळा, गवळवाडी पवनचक्कीला चोरट्यांनी केले टार्गेट

पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील भायाळा व गवळवाडी परिसरातील पवनचक्कीच्या टॉवर व नेसलमधील विविध प्रकारचे कॉपर वायर व इतर इलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्यांनी चाररून नेले. त्या साहित्याची किंमत सुमारे 72 लाख 41 हजार 694 रुपये असून अन्य एका पवन चक्कीमधूनही सुमारे 4 लाख 70 हजार 421 रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रामराय ताबें यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील भायाळा व गवळवाडी शिवारामध्ये पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. भायाळा येथील पवनचक्कीचे टॉवर व नेसलमध्ये विविध प्रकारचे कॉपर, केबल, व इतर इलेक्ट्रीक साहित्य होते. अज्ञात चोरट्यांनी पवनचक्की क्र.क्र.16 मधील कॉपर धातूचे लिफ्ट केबल, रोटर केबल, स्टार्टर केबल, आर्थिक केबल, कंट्रोल केबल, सेफ्टीचेन केबल, ब्रिड केबल, फिडबॅक केबल यासह विविध प्रकारचे इलेक्ट्रीक कॉपर धातूचे साहित्य असा एकूण 72 लाक 41 हजार 694 रुपयाचे साहित्य चोरून नेले. पुढे चोरटे याच भागातील गवळवाडी शिवारातील पवनचक्कीला लक्ष्य करत त्या पवनचक्कीमधीलही कॉपर धातू केबल व इलेक्ट्रीक साहित्य असा 4 लाख 70 हजार 441 रुपयांचे साहित्य चोरून नेले. दोन पवन चक्क्यांमधून सुमारे 77 लाख 12 हजार 135 रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरले असून या प्रकरणी उंबरविहीरा येथील रामराया बाबूराव तांबे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठार्यात गु.र.नं. 158/2025 कलम 303 (2), भा.न्या.न. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.





