गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन प्रश्न तात्काळ सोडवावा
गढी(रिपोर्टर):-गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायत ही मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असून या गावातील ग्रामसेवक श्री.तुकाराम घोलप हे एक महिन्यांपासून रजेवर असल्यामुळे त्यांच्या जागी दुसरा ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात कामे खोळंबली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाकडेही पदभार देण्यात आलेला नसून पदभार दिला नाही का कोणी घ्यायला तयार नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे पडला आहे.
ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील महत्त्वाचे कार्यालय असून या प्रकरणाकडे मात्र वरिष्ठ अधिकार्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तरी एक महिन्यापासून ग्रामसेवक नसल्यामुळे गावातील नागरिकांचे विविध वैयक्तिक लाभाचे अनुदान,पी टी आर,नाहरकत प्रमाणपत्र या सह विविध प्रमाणपत्रासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून तरी वरिष्ठ अधिकार्यांनी येथे लक्ष घालून ग्रामसेवक यांची नियुक्ती करून ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबववी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






