
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यामध्ये सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस विजेच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामध्ये शुक्ल तीर्थ लिमगाव येथे वीज पडल्याने शेतकरी अशोक लिंबाजीराव शेरकर (वय 51) यांचा आणि म्हशीचा मृत्यू झाला आहे.
माजलगाव तालुक्यामध्ये दुपारी चारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते व काही भागांमध्ये चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाला त्याचप्रमाणे तालुक्यातील शुक्लमगाव परिसरामध्ये देखील सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटात सह झाला यावेळी शेतामध्ये आपली म्हैस बांधण्यासाठी गेलेले शेतकरी अशोक शेरकर यांच्यावर वीज पडल्याने या विजेच्या धक्क्याने अशोक शेरकर आणि त्यांची म्हैस या दोघाचा ही मृत्यू झाला आहे. अशोक शेरकर यांचा मृतदेह माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शिवच्छेदन करण्यासाठी आणला आहे.






